कॅरम स्पर्धेत अमित वाडकर प्रथम

| खालापूर | वार्ताहर |

श्री साबाई माता क्लबच्या माध्यमातून कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी खालापूर, कर्जत तालुक्यातील कॅरम प्रेमी उपस्थित राहून आपले कौशल्य दाखविले.

स्पर्धेचे अनावरण माजी तालुका प्रमुख उमेश गावंड यांच्या हस्ते करण्यात आले. 32 कॅरम खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. ह्या स्पर्धेत खोपोली येथील अमित वाडकर प्रथम, तर खालापूर मधील अमित यादव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच तृतीय क्रमांक कृष्णा वाघमारे कर्जत, तर चतुर्थ क्रमांक एजाज मुजावर रसायनी यांनी पटकाविले. कॅरम स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अमित यादव, राजू देसाई, योगेश करंजकर, अनिल चाळके, गणेश लोहार, सौरभ मुळेकर आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version