| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा क्षेत्रातील कर्जत आणि खालापूर तालुका मर्यादित एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नवीन तसेच रेग्युलर कॅरम खेळणार्या स्पर्धकांचा सराव होण्यासाठी आणि खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याच्या उद्देशाने शिवालय येथे समी साळोखे पुरस्कृत कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा ड्रॉ शनिवार, दि. 8 एप्रिल रोजी कॅरम ग्रुपवर टाकण्यात आला. या स्पर्धेत एकूण 64 स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. स्पर्धा 10 बोर्डवर नियमानुसार खेळवण्यात आल्या. कर्जत कॅरम क्लब कर्जत सदस्य पांडुरंग पाटील, वैभव पेठे, राजेश भूतकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1000/- रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 700/- रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 500/- रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 500/- रुपये व आकर्षक चषक अशाप्रकारे पारितोषिक ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अश्विन बापट रसायनी, द्वितीय क्रमांक मुकेश पगारे नेरळ, तृतीय क्रमांक अमित यादव रसायनी, चतुर्थ क्रमांक श्रीकांत पोथरकर कर्जत, तर उत्तेजनार्थ क्रमांक कृष्णा वाघमारे कर्जत, सलीम शेख खोपोली, नितीन ओसवाल कर्जत, आशय पिंपुटकर नेरळ यांनी पटकाविला.







