राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या अध्यक्षपदी अमोल गुरव

| रसायनी | वार्ताहर |

राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या अध्यक्षपदी अमोल गुरव यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला.

राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे उपाध्यक्ष बंडू विरेश्‍वर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे अमोल गुरव यांनी सांगितले. गुरव समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक समाजसेवक तानाजी बाळू गुरव यांची कोकण विभागप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. यावेळी बंडू खंडागळे, कार्याध्यक्ष विजय साळुंके, निरीक्षक रमेश (काका) राजगुरव, सहखजिनदार संजय मोरे, सोशल मीडिया प्रमुख हरेश खंडागळे, सदस्य सचिन गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version