| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या कामोठे विभाग अध्यक्ष पदावर अमोल शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी पद नियुक्ती सोहळा आणि कला व सांस्कृतिक विभागाकडून आयोजित रिल्स स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळ्यात शितोळे यांच्यावर ही जवाबदारी टाकण्यात आली. 2003 साली कामोठे वसाहतीत राहायला आलेल्या शितोळे यांनी माजी आमदर विवेक पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन केली आहेत मानसरोवर स्टेशन सुरु व्हावे यासाठी देखील शितोळे कुटुंबाचे योगदान आहे.
नव्याने वसवण्यात आलेल्या कामोठे वसाहतीत पाणी, रस्ते आणि विजेच्या प्रश्नासाठी वडील मुकूंद शितोळे आणि मोठे बंधू संतोष शितोळे यांनी एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय होते. एकता सामाजिक संस्थेने कामोठे मधील ज्वलंत विषयाला वाचा फोडली आहे. त्यात प्रामुख्याने शाळेची मैदाने वसाहतीमधील मुलांना खुल्ली करणे, वाशीला जाणारा लेफ्ट टर्न साठी सायन – पनवेल महामार्ग रोखून रस्ता सुरु केला.
वसाहती मध्ये सार्वजनिक शौचालय व्हावीत ती सुरु करण्यासाठी टमरेल आंदोलन, सेक्टर – 8 मधील आरोग्य केंद्र सुरु व्हावे यासाठी अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य केंद्र आणि नंतर बांधलेले केंद्र सुरु व्हावे यासाठी आरोग्य केंद्रालाच साईन लावणे पनवेल पालिकेकडे, महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून मावेजा च्या जाचक प्रकारातून नवी मुंबई तसेच पनवेल परिसरातील असंख्य रहिवाशी संस्थांना दिलासा मिळवून दिला, कामोठे वसाहती मधील स्मशान भूमीत स्वखर्चाने दिवा बत्ती, सेक्टर 21 मधील समाजसेवा केंद्र सुरु व्हावे यासाठी केंद्रातच फटाके फोडून सिडकोचा निषेध केला, झाडांना इजा होऊ नये म्हणून खिळे मुक्त झाड हे अभियान राबवले, कोविड मध्ये कामोठे वसाहती मध्ये अनेक गरजू कुटुंबाला धान्य वाटप, घरोघर भाजी देणे, आजारी व्यक्तींच्या नातेवाईकांना मोफत खिचडी देण्यात येत होती, कोविड मध्ये कामोठे मधील हॉस्पिटल बरोबर योग्य समन्वय साधून पेशंटला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व बेड शिल्लक आहेत याची माहिती देण्यात येत होती.
अमोल शितोळे यांचे काम पाहून मा. आ. बाळाराम पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाची कामोठे विभागाची जबाबदारी दिली. मालमत्ता करा विरुद्ध पनवेल मध्ये सर्वात पहिले आंदोलन अमोल शितोळे यांच्या नेतृत्वाखाली झाले, पालिके विरुद्ध मूक मोर्चा काढून नागरिकांच्या असंतोषाला वाट करून दिली. पाणी टंचाई विरुद्ध पाणी पुरवठाकार्यालयाला चप्पल हार, पालिका आयुक्तांना हजारो पोस्ट कार्ड द्वारे कामोठेकरांच्या भावना कळवण्यात आल्या. सायन – पनवेल महामार्गावर लाईट सुरु व्हावी यासाठी पाठपुरावा केला आहे.शितोळे यांचे काम कामोठे पुरते मर्यादित नसून कर्नाळा किल्ल्याच्या अनेक आदिवासी वाड्यात त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. आज त्या भागात एकता सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.
राजकारणात पैसे असतील तरच पदे मोठमोठी पदे मिळतात हे सूत्र चुकीचे असून कार्यकर्ता निष्ठावान आणि काम करणार असला कि पक्ष देखील त्याचा योग्य मानसम्मान करतो याच सूत्राने शेतकरी कामगार पक्षाने माझी निवड केली याच समाधान आहे.
अमोल शितोळे, कामोठे विभाग अध्यक्ष
