। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 करिता निवडणुकीकामी निवडणूक निरीक्षक म्हणुन अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव यांची नेमणुक करण्यात आली आहे. तर संपुर्ण कोकण विभागातील निवडणुकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पदी किरण पाटील यांची नेमणुक करण्यात आली असल्याचे म्हसळा नगर पंचायत मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले. नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या पासुन म्हसळा नगर पंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांत अधिकारी अमित शेडगे हे काम पहात आसुन आता पर्यंत निवडणूकीचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.