। सिंधुदूर्ग । प्रतिनिधी ।
वास्को दी गामा- हावडा अमरावती एक्सप्रेस मंगळवारी सकाळी रूळावरून घसरल्याची घटना घडली. पण सुदैवाने मोठा अपघात टळला. एक्सप्रेस ट्रेन गोव्यात असताना हा अपघात घडला. दूधसागर आणि कारंजोल या भागात ट्रेनच्या लोको इंजिन डब्याची पुढची चाकं रेल्वे रूळावरून खाली घसरली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाल्याची किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती नाही. सर्व प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली असून हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच, एक आरटी ट्रेन दूधसागरला पाठवण्यात आली आहे.