ना.ना.पाटील संकुलनात अमृत महोत्सवी प्रजासत्ताक उत्साहात


| पेझारी | वार्ताहर |

को.ए.सो.च्या ना.ना.पाटील शैक्षणिक संकुल पोयनाड येथील भव्य प्रांगणामध्ये भारताचा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन सोहळा को.ए.सो.चे ज्येष्ठ संचालक सुभाष प्रभाकर पाटील तथा पंडित यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी एनसीसी, आरएसपी पथकाने कमांडर समाधान भंडारे, संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. संचालक पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संगीत पथकाने राजेंद्र म्हात्रे, सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत, ध्वजप्रतिज्ञा, ध्वजगीत देशभक्तीपर गीत सादर केले. यानंतर मान्यवरांनी एनसीसी, आरएसपी, पथकांच्या संचलनाचे निरीक्षण करण्यात आले.

चित्रकला शिक्षक देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 10वीतील विद्यार्थिनी सई पाटील आणि दिव्या पाटील यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गणतंत्र दिनाचे औचित्य साधून आंबेपूर सरपंच सुमना सुप्रभात पाटील यांचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कला आणि अभिनय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे राजन पांचाळ, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळाल्या बद्दल माऊली स्टुडिओचे वरूण उल्हास भगत, क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणार्‍या संघाचे मार्गदर्शक पुरुषोत्तम पिंगळे, विशेष प्राविण्य प्राप्त गुणवत्ता धारक व एनसीसी, आरएसपी बेस्ट कॅडेट विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दिल्ली राजपथावर संचलनासाठी निवड झालेला स्मित म्हात्रे याचे विशेष कौतुक करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी संकुलातील प्रत्येक शाखेमधून प्रतिनिधिक स्वरूपामध्ये बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये बालवाडी, बारिया प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यम, ना.ना. पाटील हायस्कूल, तसेच महिला महाविद्यालय याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. रामायण नाट्य प्रयोगासाठी राजन पांचाळ, प्रमोद पाटील, सुरेंद्र टेमकर, उपासना जुईकर, वरूण भगत, निनाद पाटील, राजेंद्र म्हात्रे, देवेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली शिरीषकुमार पाटील यांनी केले. तर पारितोषिक वाचन तुकाराम बर्गे यांनी केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी सुप्रभात पाटील, शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, स्वप्निल पाटील, के.डी.म्हात्रे, सुरेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, सुनील राऊत, लिलाधर धुमाळ, शिरीष पाटील, अनिल ठाकूर, शशिकांत पाटील, पोयनाड विभागातील ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, सदस्य, कर्मचारी, प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यकर्ते, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, सर्व आजी माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, माता-पिता पालक वर्ग असा मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

Exit mobile version