घरात घुसून 18 वर्षीय तरुणाची हत्‍या

| नाशिक | वृत्तसंस्था |

नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.5) गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. गंजमाळ परिसरातील पंचशील नगर येथे 18 वर्षीय तरुणाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्या झाल्याचे शेजारी झोपलेल्या भावालाही कळले नाही. पांडू शिंगाडे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भरवस्तीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पांडूवर शिंगाडे याच्यावर हल्ला करून हल्लेखोर फरार आहे. पांडूची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अज्ञात मारेकऱ्यांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Exit mobile version