खोपटा रस़्त्यावर दुधवाहू गाडीला अपघात

| उरण | वार्ताहर |

खोपटा पुल ते कोप्रोली रस़्त्यावरुन जाणाऱ्या सत्यम डेअरी गाडीला अपघात झाल्याची घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी ४ च्या सुमारास घडली आहे. या अपघातात चालक थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सत्यम डेअरी ही गाडी कोप्रोली गावाकडून दुध घेऊन उरण शहराकडे गुरुवारी (दि.१३) सकाळी ४ च्या सुमारास जात होती. खोपटा बस स्थानका जवळील रस़्त्यावरुन जाणाऱ्या माल वाहू टेलरने अचानक खचलेल्या साईट पट्टीवर ब्रेक लावल्याने सत्यम डेअरी गाडीची जोरदार धडक ट्रेलरला बसली. या झालेल्या अपघातात सत्यम डेअरी गाडीचे नूकसान झाले असून चालक थोडक्यात बचावला आहे.

Exit mobile version