मधमाशापालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

। अलिबाग । वार्ताहर ।
खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र व्यक्ती/संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्व-गुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/ प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ठ्ये आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार जवळ, अलिबाग, रायगड, दूरध्वनी: 02141-222642 किंवा 7020187220 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version