| महाबळेश्वर | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबलेश्वर येथील मांगर गावाचे मधाचे गाव म्हणून आज उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घोषित केले .
खादी ग्रामोद्योग विभागाचा डोंगरी भागातील हा उपक्रम आहे . या मधाच्या गावाची नोंद जगाच्या नकाशाावर होणार आहे . 100 पैकी 85 घरात मध उत्पादन प्रकल्प राबवित असल्यामुळे देशातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रमाला स्थानिक गावकर्यांचे प्रयत्न आणि कष्टाची जोड़ मिळाली आहे . च पनवेल येथे नव्याने होणार्या विमानतळ परिसरात खादी ग्रामोद्योगाचा दालन उपलब्ध होईल .याद्वारे देशी तसेच परदेशी पर्यटकांना ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेली उत्पादने आणि अस्सल मध उपलब्ध होईल.याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल . असं आदिती तटकरे यांनी सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई,आ.मकरंद पाटील यांनीही मार्गदर्शन केले.