| मुंबई | दिलीप जाधव |
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी न्याय राज्यमंत्री , माजी राज्यसभा खासदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पार्थिव व्हीटी जवळील मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे कार्यालय तसेच अंजुमान इस्लाम शाळा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचा जनाजा मरीन लाईन्स येथील बडा कबरस्थान येथे अंतिम दफन विधी पार पडला यावेळी मौलाना आझाद फाउंडेशनचे माजी उपाध्यक्ष हबीब फ़की , न्यायमूर्ति शफी परकार , मुरुडचे इर्शाद खतीब , राष्ट्रवादी कोंग्रेसचे जेष्ठ नेते अड़. माजिद मेमन , मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप , चरणसिंग सप्रा, माजी खासदार हुसेन दलवाई, मंत्री अस्लम शेख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आदिंनी हुसेन दलवाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुंबई काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.