| दहिवडी | प्रतिनिधी |
अतिशय रोमहर्षक ठरलेल्या व प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभलेल्या छावा चषकाचा मानकरी सावंतवाडी क्रिकेट क्लब ठरला. मार्डी येथील युथ फ्रेंड्स क्लब जिमखाना यांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अंतिम सामन्यात सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना फटकेबाजी करत पाच षटकांत तब्बल 99 धावा फटकावल्या. गोजिरी 11 दहिवडी संघाला हे भले मोठे आव्हान पेलवले नाही. हा संघ 83 धावांपर्यंतच मजल मारू शकला. गोजिरी 11 दहिवडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एम. के. 11 पळशी, प्रेमराज 11 आंधळी, युथ फ्रेंड्स जिमखाना 40+ व युथ फ्रेंड्स जिमखाना माण हे संघ अनुक्रमे तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावर राहिले. मालिकावीर- लखन नागरगोजे (पळशी), उत्कृष्ट फलंदाज- अलिश वायदंडे (दहिवडी), उत्कृष्ट गोलंदाज- मिलिंद भोसले (सावंतवाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- करण मोटे (मार्डी) हे वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले.
राम पोळ, राजू पोळ व युथ फ्रेंड जिमखान्याच्या खेळाडूंनी या स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. या स्पर्धेत आठ गावांचे, चार नगरपंचायतींचे, चार तालुकास्तरीय, तर चार चाळीस वर्षे वयावरील खेळाडूंचे असे एकूण वीस संघ सहभागी झाले होते. मनोज पोळ, अभिजित काळे, राम पोळ, श्रीमंत काळे, हणमंत पोळ, सुदाम नारणवर, विकी सरतापे, शैलेश बडवे, सनी साठे, बापू सावंत व ग्रामस्थ मार्डी यांच्या हस्ते व उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.






