न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची फौज


टीम इंडियाची वाढवणार चिंता
। लंडन । वृत्तसंस्था ।
इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेत किवींनी 1-0 असा विजय मिळवला. त्या मालिकेत सर्वाधिक 300+ धावा करणार्‍या फलंदाजाला संधी देऊन किवी संघानं टीम इंडियाचं टेंशन वाढवण्याची रणनीती आखली आहे. न्यूझीलंडनं 18 ते 22 जून या कालावधीत होणार्‍या वर्ल्ड स्टेट चॅम्पियनसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून फक्त एकाच फिरकीपटूला स्थान दिले आहे.

अजाझ पटेल हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे, तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे. डॉग ब्रेसवेल, जेकब डफ्फी, डॅरील मिचेल, रचीन रवींद्र आणि मिचेल सँटनर या पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ही पाचही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील संघाचे सदस्य होते. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी या खेळाडूंचे आभार मानले. डेव्हॉन कॉनवेय यानं इंग्लंडविरुद्ध द्विशतकासह सर्वाधिक 306 धावा चोपल्या आहेत.

स्टीड यांनी सांगितले की, ‘या सामन्यासाठी संघ निवडताना आम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागले. मिचेल व डॅरील यांचे योगदान अमुल्य आहे. अजाझ पटेल हा एकमेव फिरकीपटू संघात असेल आणि त्यानं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याची गुणवत्ता सिद्ध केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये तो ट्रम्प कार्ड ठरेल, असा विश्‍वास आम्हाला आहे. कॉलीन हा कसोटी संघाचा सदस्य आहेच आणि त्यानं लॉर्ड्सवर कमबॅक करताना दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याची निवड केली गेली आहे. केन विलियम्सन व बीजे वॉटलिंग यांना पुरेशी विश्रांती मिळाली आहे. अंतिम सामन्यासाठी ते पुर्णपणे तंदुरूस्त होतील, असा विश्‍वास आहे.’’

न्यूझीलंडचा संघ :
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

Exit mobile version