। पनवेल। वार्ताहर ।
पनवेल न्यायालयातील कोर्ट रूममध्ये राजेश परदेशी याने फिनेल सदृश्य द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश यांचा नातेवाइकांसोबत दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता, त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राजेश करंजाडे येथे राहत असून, त्यांचा जमिनी संदर्भात वाद सुरू आहे. यासंदर्भात पनवेलमधील दिवाणी न्यायालयात दावाही सुरू होता. या प्रकारामुळे त्रस्त असलेल्या राजेशने बुधवारी तारखेसाठी न्यायालयात गेल्यावर बाटलीतून आणलेले फिनेल सदृश्य द्रव्य कोर्ट रूममध्ये प्राशन केले. त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याला तत्काळ पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.






