भुवनेश्‍वरच्या राजाला भावपूर्ण निरोप

। सुकेळी । वार्ताहर ।

रोहा येथील जय गणेश मित्र मंडळाच्या भुवनेश्‍वरच्या राजाला भावपूर्ण अंत:करणाने ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. यावर्षीचे या मंडळाचे 24 वे वर्षे होते. या दहा दिवसांमध्ये मंडळातर्फे विविंध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक सोहळा पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नितीन माने, उपाध्यक्ष प्रविण शिर्के, सचिव दिपेश महाडीक, उपसचिव प्रथमेश घाग, खजिनदार महेश शिर्के, उपखजिनदार उमेश नाईक, तसेच जय गणेश मित्र मंडळाच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली होती.

Exit mobile version