बर्फ वाहतूक करणारा ट्रक बेलकडेनजीक पलटी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

बर्फाची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक बेलकडेनजिक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२०) रात्री 8 च्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अलिबागहून साखर कोळीवाड्याकडे बर्फ घेऊन हा ट्रक चालला होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्याकडील खड्ड्यात कोसळला. रात्रीची वेळ असल्याने यामध्ये नेमके किती जखमी झाले हे कळू शकले नाही. अपघाताचे वृत्त कळताच अलिबाग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. तसेच विद्युत ताराही तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

Exit mobile version