। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग -पेझारी मार्गावर मैनुशेठ पाडा येथे सोमवारी गॅस सिंलिंडरची वाहतूक करणारा टँकर दुपारच्यावेळी पलटी झाला. यात ट्रकचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा टँकर मुंबईकडे चालला होता. वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. पोयनाड पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोयनाड पोलिस करीत आहेत.
