माणगावमध्ये 27 कोरोनाग्रस्तांची वाढ


। माणगाव । वार्ताहर ।
संपूर्ण जगात गेली वर्षभरापासून हैदोस माजविणार्‍या कोरोना महामारीमुळे सर्वजण जेरीस आले आहेत. या महामारीची दुसरी लाट दोन महिन्यापासून आली असून रायगड जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. माणगाव तालुक्यात शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवे 27 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून 43 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तर 3 रुग्णाचा मृत्यू झाला असून तालुक्यात आता 264 रुग्ण बाधित असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Exit mobile version