सुदर्शनतर्फे पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी ग्रा.पंचायत हद्दीतील चिल्हे व तळवली या दोन गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. तर सुदर्शन केमिकल अंतर्गत सुदर्शन सीएसआर विभागातंर्गत ठिकठिकाणी ग्राम विकास प्रकल्प राबविले जात आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुदर्शन केमिकल अंतर्गत सुदर्शन सीएसआर विभागाचे वतीने सदरील वृक्षारोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माधुरी सनस, गणेश जांभुळकर, रूपेश मारबाहे, विशाल घोरपडे, रवी दिघे, शैलेश गोरे, रविंद्र मरवडे, संदीप महाडिक, दयाराम मरवडे, गणेश महाडिक, वसंत मरवडे, प्रमोद शिंदे, रामचंद्र महाडिक, रामचंद्र मरवडे, रामचंद्र बामणे, तुकाराम कोंडे, संदीप लोखंडे, अनंता लोखंडे, देवाजी मरवडे, निवृत्ती लोखंडे, तुकाराम महाडिक निवृत्ती लोखंडे,धर्मा बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version