| खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रविंद्र मरवडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून संदीप महाडिक यांची उपसरपंचपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या ग्रा.पंचायतीचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप व भाजप आघाडी यांनी ग्रामविकास आघाडीची स्थापना करून या निवडणुकीत थेट सरपंचासह शंभर टक्के यश संपादित केले. या प्रक्रियेमध्ये मनोज जाबोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी महेंद्र पोटफोडे, बाबुराव बामणे,रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, राम मरवडे, वसंत मरवडे, मारूती खांडेकर, राम महाडिक, शांताराम महाडिक, नामदेव मरवडे, गजानन बामणे, सुरेश वाघमारे,नाना शिंदे, रामचंद्र बामणे,श्र,एकनाथ मरवडे,शंकर शेलार, पांडुरंग नागावकर, मोरेश्वर मरवडे, रामचंद्र मरवडे,देवजी मरवडे,ठमाजी महाडिक,विनायक महाडिक, प्रमोद शिंदे, प्रमोद लोखंडे,किसन बामणे, विनायक शिंदे, प्रभाकर महाडिक,हरिश्चंद्र मांगुळकर, दयाराम मरवडे,निलम मरवडे,अनघा खांडेकर,सुकेशिनी महाडिक, तारामती पवार,उपस्थित होते.