शिवप्रेमी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात दशक्रिया विधीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण चिरनेर खाडी येथे उरण तालुक्यातून विविध ठिकाणाहुन नागरिक येत असतात. पण भोम गावात आल्यानंतर दोन मार्ग निघतात, त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. त्यामुळे शिवप्रेमी युवा प्रतिष्ठानच्या युवा तरुणांनी नवीन वर्षा निमित्त दिशाफलक लाऊन नागरीकांना होत असलेला त्रास या पुढे होणार नाही याचा संकल्प करत दिशाफलक लावण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरीकांनी देखील सहकार्य करुन कार्यक्रमास हातभार लावला. यावेळी शिवधन पतपेढीचे चेअरमन गणेश म्हात्रे, चिरनेर ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्रीधर पाटील, चिरनेर ग्राम सदस्य धर्मेंद्र म्हात्रे, केअर ऑफ नेचर संस्थेचे कार्याध्यक्ष महेश पाटील, गोविंद आर्टचे चेअरमन अमोल गोठणकर, जनसागर पतसंस्थेचे संचालक सुभाष पाटील, नाट्य कलाकार चांगदेव जोशी, ज्येष्ठ नागरीक बाबुराव म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version