। नवी मुंबई । वृत्तसंस्था ।
विनायक मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिली. त्यामुळे गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. सकाळी ५ च्या सुमारास हा अपघात झाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतली व सांत्वन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे. या वृत्तावर माझाही विश्वास बसला नाही. तसेच त्यांच्या परिवाराची भेट घेत या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.