पानशिलमध्ये जुना जागेच्या वाद उफाळला; धारदार शास्त्रांनी हल्ला

तलवारी, सळई, दांडकांचा वापर

| रसायनी | वार्ताहर |

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील पानशिल गावातील पाटील आणि कर्णुक या दोन कुटुंबांतील जुन्या जागेचा वाद पुन्हा उफाळून आला असून, कर्णुक कुटुंबाने मागील भांडणाचा राग मनात धरून जिवेठार मारण्यासाठी पाटील कुटुंबावर हल्ला चढविला.

याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशिल गावातील भास्कर कर्णुक, सखाराम कर्णुक, तुकाराम कर्णुक, पंकज कर्णुक, मोहन कर्णुक, दिलीप कर्णुक, बबन कर्णुक यांनी शेजारीच राहणारे मंगेश पाटील, जयराम पाटील, काशिनाथ पाटील, सरिता पाटील, भरत पाटील, महेंद्र पाटील यांच्यावर जुन्या जागेचा वादाचा राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवून जीवे ठार मारण्याचा हातात तलवारी, लाकडी दांडके, लोखंडी सळई घेऊन महेंद्र पाटील (34) यांच्या घरात घुसून व जखमी साक्षीदार यांना शिविगाळ व मारहाण करून गंभीर स्वरूपाचा दुखापती केल्या. यात पाटील कुटुंबातील सदस्य जखमी झाले. तसेच घरातील टीव्ही व प्लास्टीक स्टूल तोडून नुकसान करुन तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपींविरुद्ध रसायनी पोलीस दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसडीपीओ व्ही.पी. लगारे, रसायनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Exit mobile version