| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा या औदयोगिक क्षेत्राला जोडणारा दांड – रसायनी हा मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तो तातडीने दुरुस्त करावा, या मागणीसाठी मोहोपाडा शिवसेना शाखा शहरप्रमुख संतोष पांगत यांच्यावतीने मोहोपाडा प्रवेशद्वारावरासमोर रास्ता रोको करण्यात आला.
दांड-आपटा रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यावरील खड्डे चुकवितांना अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अखेर मोहोपाडा शिवसेना शाखेच्यावतीने शिवसैनिक रस्त्यावर उतरले. दांड रसायनी रस्त्याची परिस्थिती खुपच बिकट झाली आहे. यासाठी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या रास्ता रोको आंदोलनात रमेश पाटील, प्रिती कडव, अजित सावंत सद्गुणा पाटील, सुरेश म्हात्रे, भाग्यश्री पवार, रोशन राऊत, मारुती खाने, दत्ता खाने, संतोष खाने, स्वप्निल राऊत, मंगेश पाटील, योगेश खाने, दिलिप कर्णुक, प्रशांत मोकाशी, विलास करवले आदीसह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, शिवसेना पुरस्कृत संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता रुपाली पाटील यांनी येत्या आठवड्यात दांड रसायनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले. यावेळी रसायनी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.