रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेलजवळील सोमाटणे रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. या बेवारस मयत इसमाला सोमाटणे रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेने धडक दिल्याने तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या मयत इसमाच्या मृत्यूबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version