| पनवेल | प्रतिनिधी |
रेल्वेने दिलेल्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमटणे रेल्वे स्टेशनजवळ पनवेल येथे घडली. या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस घेत आहेत. 3 नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.






