| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील एका सराफाच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या त्रिकुटाने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोने चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत सराफाला उशिरा माहिती पडल्याने त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे.
पनवेलमधील ठाणा नाका येथे राहणाऱ्या तक्रारदारांचे दुकान आहे. या दुकानामध्ये दोन महिला व एक पुरुष दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. दुकानातील कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी लक्ष असल्याचे पाहून त्यांनी सोन्याचे कानातले आणि लॉकेट चोरले होते. गेल्या काही दिवसांत दुकानातील सामानाची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील त्रिकुटाचा शोध पोलीस घेत आहेत.
अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
