| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत 25 वर्षीय सुमित सुरेंद्र झा याचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी 21 जानेवारी रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुमित सुदर्शन झा हा उलवे, सेक्टर 16 येथे राहात असून, आठ जानेवारी रोजी होंडा कंपनीची एसपी 125 मोटरसायकल क्रमांक एम एच 46 सीजे 8744 घेऊन तो कामानिमित्ताने बाहेर गेला होता. उलवे पनवेल लेने जात असताना जेएनपीटी रोड जेडब्ल्यू आर कंपनीच्या समोर काळुबाई मंदिराजवळ कुंडेवहाळ या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत सुमित झा गंभीर जखमी झाला. त्याला जे जे हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी 14 जानेवारी रोजी त्याला मृत घोषित केले.
अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक; तरुणाचा मृत्यू
