| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील चिल्हे येथील तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै. दगडू खांडेकर यांच्या पत्नी तसेच रोहा तालुका कुणबी समाजाचे उपाध्यक्ष तथा शेकापचे खांब विभागीय नेते मारुती खांडेकर यांच्या काकी तसेच नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा.ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब येथील माध्यमिक शिक्षक अनिल खांडेकर व कुणबी समाज बांधव शिवाजी खांडेकर यांच्या मातोश्री आनंदीबाई दगडू खांडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्या 85 वर्षांच्या होत्या.
आनंदीबाई यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्ययात्रेसाठी ग्रामस्थ, त्यांचे नातलग, सगेसोयरे, आप्त परिवार तसेच खांब पंचक्रोशीसह रोहा तालुक्यासह विविध भागातून सामजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच विविध क्षेत्रातील बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवारी 16 जुलै रोजी, तर तेरावे उत्तरकार्य शुक्रवारी 19 जुलै रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी चिल्हे येथे होणार आहेत.