पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या

। मुंबई । प्रतिनिधी ।

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी शनिवारी (दि.22) सायंकाळी वरळीतील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर असून त्या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. या दोघांचा फेब्रुवारी 2025 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यात डॉ. गौरी यांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version