। अलिबाग । वार्ताहर ।
32 रायगड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांना युवा वर्गाचा भरगोस पाठिंबा मिळत आहे. देशात सध्या वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात युवकांमध्ये प्रचंड संताप आहे. येणार्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील युवक आपला राग मतपेटीतून व्यक्त करतील, असे मत अलिबाग-मुरुड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड. कौस्तुभ पुनकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
देशात सध्या एकाधिकारशाही सुरू असून देश पुन्हा हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. हि निवडणूक देशाचे लोकतंत्र, संविधान वाचवण्यासाठीची लढाई असून युवक आता इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विक्रमी मतांनी विजयी करतील. संपूर्ण अलिबाग-मुरुड विधानसभेत युवक काँग्रेसची फळी जोमाने प्रचाराचे काम करत आहे. अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य मिळेल, असे मत अँड.कौस्तुभ पुनकर यांनी व्यक्त केले.