ऑस्ट्रेलियासमोर 240 धावांचे लक्ष; भारतीय गोलंदाजांची कसोटी
। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला आहे. विश्वचषकात भारत पहिल्यांदाच ‘ऑल-आऊट’ झाला असून कांगारूसमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले.
या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा 9, मोहम्मद शमी 6, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज 9 धावा करून नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले.