7 विकेट्स घेत ‘दे धक्का’
| लंडन | वृत्तसंस्था |
नुकतीच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याची घोषणा जेम्स अँडरसनने केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर शेवटची कसोटी खेळणार आहे. तत्पूर्वी अँडरसनने काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. नॉटिंघमशरच्याविरुद्ध फक्त 35 धावा देत 7 गडी बाद केले. साउथ पोर्टमध्ये खेळत असलेल्या सामन्यात लँकशरने प्रथम फलंदाजी करताना 353 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नॉटिंघमशरच्या फलंदाजांना जेम्स अँडरसनने मैदानात टिकूच दिलं नाही. स्विंग आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करत फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अँडरसनने पहिल्यांदा कर्णधार हसीब हमीदला बोल्ड केलं. त्यानंतर यंग विल, जो क्लार्क, जॅक हेन्स, लिंडन जेम्स यांना तंबूचा रस्ता दाखवला. अँडरसनने सुरुवातीच्या सात पैकी 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
जेम्स अँडरसनच्या स्विंगपुढे फलंदाजांचा तसा निभाव लागत नाही. पण साउथ पोर्टमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. नॉटिंघमशरच्या फलंदाजांना शॉर्ट आणि अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने अडचण निर्माण झाली. त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना खेळाडू चाचपडताना दिसले. जेम्स अँडरसनने 16 षटकात 3 निर्धाव षटकं टाकत 35 धावा देत 7 गडी बाद केले. बेलेने 11 षटकात 3 निर्धाव टाकत 22 धावा देत 2 ग़डी बाद केले. तर डेन पीटरसन धावचीत होत तंबूत परतला. नॉटिंघमशरने पहिल्या डावात सर्वबाद 126 धावा केल्या. त्यामुळे फॉलोऑनची नामुष्की ओढावली. आता 11 षटकात बिनबाद 31 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
नॉटिंगहॅमशायर (प्लेइंग इलेव्हन): हसीब हमीद (कर्णधार), बेन स्लेटर, विल यंग, जो क्लार्क (विकेटकीपर), जॅक हेन्स, लिंडन जेम्स, लियाम पॅटरसन-व्हाइट, केल्विन हॅरिसन, ऑली स्टोन, डिलन पेनिंग्टन, डेन पॅटरसन.
लँकेशायर (प्लेइंग इलेव्हन): कीटन जेनिंग्स (कर्णधार), ल्यूक वेल्स, जोश बोहानन, जॉर्ज बेल, मॅथ्यू हर्स्ट (विकेटकीपर), जॉर्ज बाल्डरसन, ख्रिस ग्रीन, टॉम बेली, विल विल्यम्स, नॅथन लियॉन, जेम्स अँडरसन