अलिबाग।शहर प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या नवीन मुख्याधिकारीपदी अंगाई साळुंखे यांची नियुक्ती झाली असून, गुरूवारी (दि. 16) त्यांनी पदभार स्विकारला.यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदिप नाईक, नगरसेवक अजय झुंजारराव, वृषाली ठोसर, सुरक्षा शहा, अनिल चोपडा, संजना किर आदी उपस्थित होते. अंगाई साळुंखे यांनी यापूर्वी वसई-विरार महानगरपालिकेत सहआयुक्त म्हणून पदभार सांभाळला होता.






