। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेचे खा.अनिल देसाई यांची स्थानिय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर खा.गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आली होती. पण गेल्याच आठवड्यात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या रिक्तपदी अनिल देसाई यांची निवड केली गेली आहे.
कीर्तिकर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही होते. कीर्तिकरांच्या गच्छंतीनंतर शिवसेना नेतेपद आणि लोकाधिकार समितीचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी सहा नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं बोललं जात होतं. अनिल देसाई यांचं नाव सुरुवातीपासूनच लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर मानलं जात होते.