| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडी टिकवून होते. मात्र, त्यानंतर अनिल देसाईंनी मोठी आघाडी घेत, राहुल शेवाळेंना पिछाडीवर टाकलं आणि मुंबईतील पहिला विजय ठाकरेंकडे खेचून आणला. पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अशातच मतदारराजानं ठाकरेंच्या बाजूनं कौल देत अनिल देसांईंच्या गळ्यात विजयाची माळ घातली. कष्टकऱ्यांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाला भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.