। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.जे.जमादार यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. ईडीकडून दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण सीबीआयकडून त्यांची अद्याप सुटका नाही.
अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले असून त्यांच्या जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख यांनी १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून ते नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात होते.