। कर्जत । वार्ताहर ।
सह्याद्री आदिवासी निवासी प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांची निवासी शाळेला इनरव्हील क्लब कर्जतच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे सुमारे सतरा वर्षापासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मतिमंद मुलांसाठी कार्य करीत असलेल्या शाळेला इमारत बांधकामास इनरव्हील क्लबच्या कर्जतच्यावतीने अकरा हजार रुपयाचा धनादेश संस्थेस सुपूर्त करण्यात आला.
याप्रसंगी क्लबच्या अध्यक्ष उत्तरा वैद्य, उपाध्यक्ष वनिता सोनी, तन्वी जोशी, पल्लवी सावंत,कीर्ती जोशी सुलोचना गायकवाड,संजीवनी घुमरे, उज्वला पाटील, दीपा खणाल आदी उपस्थित होत्या. यावेळी शाळेतील मुलांना तन्वी जोशी आणि किर्ती जोशी यांच्यामार्फत खाऊचे वाटप करण्यात आले.