। मुंबई । वृत्तसंस्था ।
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, न्यायालयाने अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने देशमुखांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत देशमुखांसह इतरांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.