कारागृहात पडल्यामुळे होणार शस्त्रक्रिया
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. अनिल देशमुखांना उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख जेलमधील बाथरूम मध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे. चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.