अनिल परब यांना जामीन मंजूर

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
दापोली, रत्नागिरीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब, साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम या दोघांना प्रत्येकी 15 हजारांचा जामीन दापोली न्यायालयाने मंजूर केला. पुढील सुनावणी 23 फेब्रुवारीला होणार आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी या आधीही परब यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र शासकीय कामकाजाचे कारण देत ते एकदाही हजर झाले नव्हते. अखेर गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागले.

Exit mobile version