| पाली | प्रतिनिधी |
गणेशोत्सवानंतर पुणे व मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांनी माणगाव विळे मार्गे पाली-खोपोली राज्य महामार्गावरून प्रवास केला. यावेळी रविवारी (दि.24) रात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने आतोने हद्दीमध्ये काही जनावरांना ठोकर दिली. या धडकेत रस्त्यावरील जनावरे जखमी झाली. याबाबत अमर यादव यांनी माजी सरपंच रोहन दगडे यांना माहिती दिली. त्यानंतर दगडे यांनी पशुवैद्यकीय चिकित्सक प्रशांत वारगुडे यांना बोलावून सोमवारी (दि.25) जखमी जनावरांवर उपचार करून घेतले. या घटनेमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या कारवाई करण्याची मागणी केली आहे.