| रोहा | प्रतिनिधी |
रोह्यातील बंगळे आळी येथील रहिवासी संजय शेठ यांची कन्या अंकिता हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्न्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची समजली जाणारी चार्टर्ड अकाऊंटन्ट (सीए) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
अंकिता हिने सातत्यपूर्ण परिश्रम, प्रबळ आत्मविश्वास आणि आई कै. सायली तसेच आई सीमा, वडील संजय, आजी वनिता मदन शेठ, तसेच दादा-वहिनी यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवृंद तसेच रोहा शहरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोह्यातील केईएस मेहेंदळे हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अंकिता हिने जे.एम. राठी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील एस.पी. कॉलेजमध्ये बीबीए शिक्षण पूर्ण करुन सीएच्या परीक्षेत देदीप्यमान कामगिरी बजावली आहे. पुढे आर्थिक क्षेत्रात काम करत समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचा वाटा उचलण्याचा संकल्प अंकित शेठ हिने केला आहे.






