अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

। वावोशी । वार्ताहर ।

‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.’ या जहाल वाक्यातून दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट करणारे तसेच आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबर्‍या, पोवाडा, लावण्या, वग लिहिणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांची पुण्यतिथी खोपोली येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात साजरी करण्यात आली. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान असल्याचे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले. तर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे लेखन हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित असून त्यांनी आपल्या या संघर्षमय जीवनप्रवासातून आपल्या ज्ञानाच्या जोरावर शोषित, वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले असल्याचे मनोगत माजी नगरसेवक हरीश काळे यांनी व्यक्त केले.

यावेळी खोपोलीचे माजी नगरसेवक डॉ. सुनील पाटील, हरीश काळे, शंकर कुंडले, प्रल्हाद बट्टवार तसेच, विजय कुंडले, सुभाष सूर्यवंशी, दिनकर मोहिते, लक्ष्मण घोटमुकले, सतीश महापुरे, योगेश कुंडले, स्वप्नील कुंडले, संतोष घोटमुकले, राम भोगे, निलेश लोकरे, कृष्णा जाधव, राजू आयवळे, गुरप्पा जाविर, सतीश लोकरे, राजू केदारी आदी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version