। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील धानकान्हे येथील गावाचे श्रद्धास्थान असलेल्या धानेश्वर मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी देवतांना अभिषेक व पूजाविधी, श्री. सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
यावेळी सखाराम कचरे, धोंडू कचरे, अर्जुनराव कचरे, पांडुरंग कचरे, पांडुरंग गोसावी, पोलीस पाटील देवजी कचरे, चंदू गोसावी, महादेव कचरे, जनार्दन गोसावी, अप्पा शेलार, चंद्रकांत जाधव, बबन जाधव, सुभाष जाधव, राजेश कचरे, दिलीप कचरे, सुदाम कचरे, सहदेव बाईत तसेच सर्व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.