। कर्जत । प्रतिनिधी ।
दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरपरिषद प्रशासकिय अधिकारी उमेश राऊत, लेखनिक रविंद लाड, रुपेश पाटील, विभावरी म्हामूणकर, सामिया चौगुले आदी उपस्थित होते.