कोकण कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा


| नेरळ | वार्ताहर |

कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 51 वा वर्धापन दिन सोत्सा साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भगत यांनी संशोधन केंद्राच्या शतकोत्तर वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी भात तज्ज्ञ डॉ. भरत वाघमोडे, कृषिविद्यावेत्ता डॉ.एस. बी. गंगावणे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, कनिष्ठ भात पैदासकार डॉ.जे. पी. देवमोरे, सहा. भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वणवे, मृद शास्त्रज्ञ डॉ. देवदत्त जोंधळे, कृषिविद्यावेत्ता डॉ दीपक बोरसे, जीवरसायन शास्त्रज्ञ डॉ. तुषार बेडसे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version