। पोयनाड । वार्ताहर ।
गुरूवर्य मोरेश्वर भाऊ महाराज (कै. मोरेश्वर शिवराम थळे) हे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे परमभक्त होते. त्यांच्या पश्चात मंदिर समिती दिगंबर थळे, अध्यक्ष भगवान नाईक, उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सेक्रेटरी यांच्या पुढाकाराने सोळावा वर्धापन दिन सोहळा शनिवारी वाघोडे येथे झाला.
अभिषेक, श्रीपादुका पूजन, लघुरूद्र, सामुदायिक पोेथी वाचन, ध्वजारोहण, भजन, आरती, महाप्रसाद तसेच डॉ.डी.सी.शिवकर यांचे किर्तन पार पडले. किर्तनाला हार्मोनियम निशिगंधा पाटील व कृष्णा भगत यांनी तबल्याची साथ दिली. गुरूवर्य मोरेश्वर महाराज यांनी भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी राखली. मंदिराशेजारीच आदिवासी वाडी व वाघोडे गावातील ग्रामस्थांना भक्तीची वाट दाखविली. आदिवासी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष भगवान नाईक आदिवासी समाजासाठी मोलाचे कार्य करीत आहेत. त्यांना मोरेश्वर भाऊंच्या मुलाचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले. आदिवासी बांधवांना व्यसनमुक्त करण्यामध्ये मोरेश्वर भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मंदिर बांधले व भक्तीच्या माध्यमातून समाजकार्य केले. त्यामुळे वर्धापन दिनासाठी उपस्थित म्हणून मा.आ. पंडित पाटील यांनी मोरेश्वर भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. या सोहळ्याप्रसंगी अॅड. आस्वाद पाटील, जि.प.सदस्य भावना पाटील, जि.प.सदस्य चित्रा पाटील, जि.प.सदस्य शंकरराव म्हात्रे, शेकाप जिल्हा सरचिटणीस कृष्णा जाधव, सरपंच वाघोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.