| रसायनी | वार्ताहर |
बॉम्बे डाईंग कंपनी येथे एनआयपीएमचा 44 वा वर्धापनदिन मोहोपाडा कंपनीच्या वेस्ट कॉलनीच्या क्लब हाऊसमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयटीएमचे उपाध्यक्ष मिलिंद सूर्यवंशी यांनी केले. तर एनआयपीएम रायगड चाप्टरचे अध्यक्ष अंबादास यादव यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व एनआयपीएमचे मेंबरशिपचे महत्त्व आणि फायदे सांगितले.
बॉम्बे डाईंग कंपनीचे कार्मिक महाव्यवस्थापक सोमेश्वर काळे यांनी पाहुण्यांचे आभार मानून कंपनी अशा सामाजिक कार्यक्रमास नेहमीच मदत करत आलेले आहे आणि पूर्वापार पद्धतीनुसार पुढेही मदत करीत राहील अशी ग्वाही दिली. कंपनीचे महाव्यवस्थापक मिश्रा यांचे व काळे साहेब धार्मिक महाव्यवस्थापक यांनी केलेल्या आयोजनाबद्दल व संयोजनाबद्दल एनआईपीएमच्यावतीने सत्कार करून त्यांचे व कंपनीचे सर्वांचे मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमास रसायनी, पनवेल आणि महाराष्ट्रातील विविध विभागातील कर्मिक वरिष्ठ अधिकार्यांनी हजेरी लावली होती. बॉम्बे डाईंग कंपनीचे एनआयपीएमच्यावतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.